तामिळनाडूमधील या गावात सरकारनेदेखील बंदी घातली आहे.

Video Credits - _rohiraj (Instagram)

तामिळनाडूमधील धनुषकोडी या परिसरात दिवसा पर्यटकांची भरपूर गर्दी बघायला मिळते पंरतु रात्री तिथे कोणीही जात नाही.

रात्री इथे जाण्यास मनाई आहे कारण राज्य सरकारने या परिसराला घोस्ट सिटी म्हणून घोषित केले आहे.

या जागेचा प्रभू श्रीरामाशी संबंध आहे, असे म्हटले जाते की रामाने लंका जिंकून परत येताना विभीषणाला राज्यावर बसवले.

विभीषणाने रामाला लंकेत येणार पूल तोडण्याची विनंती केली असता रामाने तो पूल बाण मारून तोडला तेव्हा पासून त्या जागेला धनुषकोडी म्हटले जाते.

प्रमुख पर्यटनस्थळ असले तरी स्थानिक लोक या ठिकाणी राहाण्यास घाबरतात. १९६४ मध्ये इथे एक मोठे चक्री वादळ आले होते.

वादळात हे संपूर्ण गाव नष्ट झाले तेव्हा पासून येथे कोणीच राहत नाही शिवाय येथील लोकांना विचित्र आवाजदेखील ऐकू येतात.

अनेकांनी इथे भूत दिसल्याचा दावा केला आहे म्हणूनच सरकारने येथे जाण्यास बंदी घातली आहे.