कुलधारा हे राजस्थानचे घोस्ट व्हिलेज म्हणून ओळखले जाते. भारतातील  झपाटलेल्या ठिकाणांपैकी हे एक मानले जाते.

Video Credits - _rohiraj (Instagram)

पालीवाल ब्राह्मण लोकांचे हे निवासस्थान होते. या प्रदेशातील दिवाणाने इथल्या लोकांवर प्रचंड कर लावला होता. त्यामुळे गावकऱ्यांना गावात टिकून राहणे अत्यंत कठीण झाले होते.

तसेच त्याची नजर समाजातील एका मुलीवर होती आणि त्याला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा होती. परंतु समाजाने ती नाकारली त्यामुळे त्याने गावकऱ्यांना धमकवण्यास सुरुवात केली.

त्याला हवे तसे न मिळाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. त्यामुळे इतर 84 गावातील लोकांसहित त्यांची प्रतिष्ठा राखण्यासाठी पालीवाल्यांनी गाव सोडले.

इथल्या लोकांनी इथे कोणीही राहू शकणार नाही असा शाप या गावाला दिला. त्यामुळे आजही या गावात कोणीही राहत नाही.

1997 मध्ये चार धाडसी लोकांनी इथे राहण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यांना वाईट शक्तींना सामोरे जावे लागले. तेव्हापासून संध्याकाळी सहा नंतर या गावात कोणालाही प्रवेश दिला जात नाही.