देशातील सर्वात मोठ्या फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्सपैकी एक रामोजी फिल्म सिटी हैदराबाद हे पर्यटन आणि मनोरंजन केंद्र म्हणूनही काम करते.

Video Credits - _rohiraj (Instagram)

निजाम सुलतानाच्या युद्धभूमीवर फिल्मसिटी बांधली गेल्याचे सांगितले जाते. येथील हॉटेलसुद्धा मृतसैनिकांच्या भुतांनी पछाडले असल्याचे सांगितले जाते.

येथे चित्रीकरण करत असताना चित्र विचित्र गोष्टी घडत असल्याच्या घटना आजही सांगितल्या जातात. अचानक बल्ब पडणे, दरवाजा बंद असलेल्या खोल्यांमधून आवाज येणे.

यासोबतच सेटवर चक्कर येऊन पडणे, बाजूला कोणी नसताना कोणीतरी आहे असे जाणवणे अशा घटना येथे वारंवार घडत असतात.

काही तज्ञ लोकांनी या भागाची पाहणी केल्यानंतर मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी या भागात कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

त्यामुळेच भारतातील सगळ्यात जास्त नकारात्मक एनर्जी असणाऱ्या ठिकाणांमध्ये या ठिकाणाचा समावेश होतो.