मुंबईला आल्यावर पर्यटकांसाठी हॉटेल ताज हे प्रमुख आकर्षण आहे. एका बाजूला भव्य समुद्र आणि दुसऱ्या बाजूला असलेले हॉटेल ताज आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

Video Credits - _rohiraj (Instagram)

सामान्य माणसाला या हॉटेल मध्ये जाणे परवडत नसले तरी या हॉटेलच्या बाहेर उभे राहून फोटो काढण्याचा मोह सहसा कोणाला आवरत नाही.

परंतु बऱ्याच जणांना ही माहिती नसेल की ज्या वास्तूरचनाकाराने या वास्तूची निर्मिती केली तो या हॉटेल मध्येच मृत्यू पावला होता.

त्याने स्वतः या हॉटेल मध्ये आत्महत्या केली होती कारण त्याला हवे तसे डिझाईन तयार होत नव्हते.

तेव्हा पासून इथे येणाऱ्या पर्यटकांच्या मते येथे कोणाची तरी सावली वावरत असल्या सारखे वाटते.