महाराष्ट्रातील नागपूर शहर आपल्या लोकसंस्कृतीसाठी भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावरसुद्धा प्रसिद्ध आहे.

Video Credits - _rohiraj (Instagram)

या शहरातील काही ठिकाणे पर्यटकांमध्ये जशी प्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे काही ठिकाणे स्थानिक लोकांमध्ये त्यांच्या भयकथांसाठी प्रसिद्ध आहेत.

या यादीत पहिल्या नंबर वर येते ते शुक्रवार तलाव मुक्ती शहरापासून काही अंतरावर असलेला हा तलाव झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक आहे.

हा तलाव आत्महत्या तलाव या नावाने प्रसिद्ध आहे. 250 वर्षांपासून शंभरहून अधिक लोकांनी या तलावात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

पौराणिक कथेनुसार या तलावात काळी जादू आणि राक्षसी शक्ती कार्यरत असल्याचे सांगितले जाते. येथे संध्याकाळ झाल्यानंतर लोक आजही एकटे जाण्यास घाबरतात. इथल्या लोकांच्या म्हणण्यानुसार तुम्ही इथे एकटे गेल्यास हा तलाव तुम्हाला आत्महत्या करण्यास परावृत्त करतो.