लेह लडाख मधील मनाली लेह रस्त्यावरील ही घटना आहे.
Video Credits - _rohiraj (Instagram)
जिथे एका वळणावर एक मंदिर आहे ज्याला भूत मंदिर म्हणून ओळखले जाते आणि तिथून जाताना त्या मंदिरात एक पाण्याची बाटली द्यावीच लागते.
काही वर्षांपूर्वी एक ट्रक तिथून जात असताना त्याचा भीषण अपघात झाला. ट्रकमध्ये चालक आणि त्याचा सहकारी होता.
अपघात झाल्यानंतर ट्रकचा चालक तिथून पळून गेला परंतु त्याचा सहकारी विव्हळत तिथेच जखमी अवस्थेत पडून पाणी मागत होता त्यातच त्याचा मृत्यू झाला.
त्या मृत व्यक्तीला तिथेच पुरले असल्याचे सांगितले जाते, आजही तिथून जाताना पाणी मागितल्याचा आवाज येतो, म्हणून इथल्या लोकांनी येथे मंदिर बांधले.
या मार्गावरून प्रवास करणारे ट्रक चालक या मंदिरात पाण्याची बाटली दिल्याशिवाय पुढे जात नाहीत.