अमृता खानविलकरने तिच्या आणि तिच्या नृत्यदिग्दर्शकावरील प्रेमाबद्दल चाहत्यांचे आभार मानणारी एक पोस्ट तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे.

All Images Credit - Google

'झलक दिखला जा 10' हा टीव्हीवरील एक लोकप्रिय शो आहे. या कार्यक्रमात नुकताच एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. कालच्या एपिसोडमध्ये डबल एलिमिनेशन करण्यात आले आहे.

त्यामुळे अभिनेत्री अमृता खानविलकर आणि पारस कलनावत या दोघांना डान्स शोचा निरोप घ्यावा लागला.

पारसला बाहेर गेला हे आम्ही समजू शकतो, पण नृत्यात पारंगत असलेली अभिनेत्री अमृताला बाहेर जावे लागले, असे म्हणत प्रेक्षकांनी संताप व्यक्त केला आहे.

यावरून सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे. चाहत्यांनी चॅनलचा हा निर्णय चुकीचा ठरवला आहे.

मागच्या आठवड्यामध्ये स्पर्धकांचे मार्गदर्शक बदलले होते. त्यामुळे अमृताला सनम जोहरसोबत परफॉर्म करावे लागले होते. तिच्या मायकेल जॅक्सनच्या अभिनयाचे करण जोहर, नोरा फतेही आणि माधुरी दीक्षित यांनी अमृताचे कौतुक केले होते.

मात्र, ती काही स्टेप विसरल्याने ती नॉमिनेट झाली. शेवटी, अमृता, पारस आणि निती टेलर  डेंजर झोनमध्ये गेले आणि नीती सुरक्षित झाली.

अमृता खानविलकरने तिच्या आणि तिच्या नृत्यदिग्दर्शकावरील प्रेमाबद्दल चाहत्यांचे आभार मानणारी एक पोस्ट तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली आहे. “आज गेल्यानंतरही इतके प्रेम दिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानू शकत नाही. मी आणि प्रतीक कुठेकर खरंच भारावून गेलो आहोत. वेळ आणि देव सर्वकाही ठीक करतो. ”